
कणकवली मध्ये गोदामात सिमेंटची पोती उतरवताना कामगाराचा मृत्यू.
गोदामामध्ये सिमेंटची पोती उतरण्याचे काम सुरू असताना एका कामगाराचा मृत्यू झाला.रहमान अब्दुल मानगुल (वय ५६, रा. संकेश्वर, ता. चिक्कोडी, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. आज सकाळी ११.१० च्या दरम्यान ही घटना घडली.कर्नाटकातील शिवनी येथून सिमेंट घेऊन कल्लू गुलाबसिंग रजपूत (वय ३०) आणि रहमान मानगुल हे आज ट्रकमधून कणकवलीत आले होते.
सकाळी अकराच्या सुमारास त्यांनी आपला ट्रक महामार्गावरील वागदे येथील पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामासमोरपंपाच्या मागील बाजूस असलेल्या गोदामासमोर उभा केला. त्यानंतर रहमान मानगुल हे ट्रकमधील सिमेंटची पोती गोदाममध्ये ठेवत होते.
यावेळी सकाळी ११.१० च्या सुमारास मानगुल यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने ते तेथेच कोसळलेत्यांना अधिक उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर त्यांना ओरोस जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर कल्लू रजपूत यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. या घटनेचा तपास पोलिस नाईक मनोज गुरव करत आहेत.