
प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांच्यावर कारवाई करावी,रिफायनरी विरोधक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
राजापूर तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रद्द करावा, बारसू ते देवाचे गोठणे सड्यावरील कातळशिल्प संरक्षित करावे, बारसूच्या सड्यावर झालेले माती परीक्षण बेकायदेशीर असल्याने प्रशासकीय अधिकारी व मंत्री यांच्यावर कारवाई करावी, ग्रामस्थांवरील खोट्या केसेस मागे घेणे व जमीन व्यवहारांची व जमीन दलालांची कसून चौकशी करावी, अशा मागण्या बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या.
राजापूर दौर्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या अमोल बोळे, वैभव कोळवणकर, नरेंद्र जोशी, सतीश बाणे, सुरज आंगले व सत्यजीन चव्हाण यांनी राजापूर येथील विश्रामगृह येथे भेट घेत निवदेन दिले आहे. यामध्ये कोकणाच्या पर्यावरणासाठी घातक असा प्रदूषणकारी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प नकोच, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच बारसू ते देवाचे गोठणे येथील पठारावर २०० पेक्षा अधिक कातळशिल्प असून संपूर्ण सडाच संरक्षित करण्याची मागणी केली. www.konkantoday.com




