श्री देव मार्लेश्‍वरच्या विवाहाचे वेध, १२, १३ जानेवारी दरम्याने विविध धार्मिक कार्यक्रम.

देवरूख शहरापासून जवळच असलेल्या आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्‍वर देवालय (मठ) चा यात्रोत्सव सोहळा दि. १२, १३ जानेवारी दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. दि. १२ रोजी सकाळी १० वाजता वरद शंकराची पूजा, दुपारी ३.४५ वाजता ध्वजारोहण, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत श्री मार्लेश्‍वर देव-देवतांना हळद लावण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत खेळ पैठणीचा, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ ते ९ महाप्रसाद, रात्री ९ वाजता गर्जा महाराष्ट्र माझा हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दि. १३ जानेवारीला दुपारी ३ वाजल्यापासून विविध मानांच्या पालख्या, दिंड्यांच आंगवली येथील श्री मार्लेश्‍वर मंदिरात आगमन, सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत खेळ पैठणीचा भाग-२, सायंकाळी ७.३० ते ९ या वेळेत श्रीदेव मार्लेश्‍वर विवाह सोहोळ्यात जाण्यापूर्वीचे सर्व विधी मंदिरात होतील. रात्री ११.३० वाजता श्री देव मार्लेश्‍वर, चि. सौ. का. गिरीजादेवी यांच्या कल्याणविधी सोहोळ्याकरिता पालख्या, दिंड्यांचे शिखराकडे प्रयाण होणार आहेत. दोन दिवस आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमात जास्तीत जास्त भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री मार्लेश्‍वर देवस्थान रिलिजस ऍण्ड चॅरिटेबल ट्रस्ट आंगवली, समस्त ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button