नो शेठ, नो साहेब, ओन्ली भैय्या हीच आपली ओळख -आमदार किरण सामंत.
राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक विकसनशील म्हणून साखरपा-लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचा नावलौकीक कसा होईल. विकासापासून कोणतेच क्षेत्र वंचित राहणार नाही, यावर आपला भर राहील. यापुढे नो शेठ, नो साहेब, ओन्ली भैय्या हीच आपली ओळख मतदार संघासह जिल्ह्यात राहील, कार्यकर्त्यांस मतदारांनी आपल्याला केवळ भैय्या म्हणूनच हाक मारावी, असे आवाहन साखरपा-लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी केले. वाढदिवसाचे औचित्य साधून ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार किरण सामंत यांचा दि. ७ जानेवारीला वाढदिवस साजरा झाला. साखरपा-लांजा-राजापूर विधानसभा मतदार संघासह रत्नागिरी विधानसभा मतदार संघात कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांद्वार आ. सामंत यांचा वाढदिवस साजरा केला. मंगळवारी सकाळी आ. सामंत बोर्डींग रोड येथील त्यांच्या कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य मतदार, अधिकारी, कर्मचारी यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती.www.konkantoday.com