
दापोली शहरात अल्पवयीन मुलींच्या छेडछाड प्रकरणी पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा.
दापोली शहरात अल्पवयीन मुलाकडून अल्पवयीन मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ६ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका मुलाने शाळेतून घरी जाणार्या मुलीला थांबवून तिचा हात धरून मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले होते. तसेच छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला. या प्रकरणामुळे दापोलीतील शांततेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेवून पोलिसांना वरिष्ठांनी सतर्कतेचे आदेश दिले होते.
दापोली पोलीस ठाणेत या बाबत कलम ७५ (२) ७८ (२) पोक्सो ८,१२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत. दापोली शहरातच ४ जानेवारी रोजी सायंकाळी एका २४ वर्षीय युवतीला थांबवून तिच्याशीही अश्लिल चाळे करण्याचा प्रयत्न याच मुलाने केल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.www.konkantoday.com