
जिंदल पोर्ट कंपनीतील एलपीजी वाहतुकीस परवानगी, ग्रामस्थ आक्रमक.
जिंदल पोर्ट कंपनीतील वायूगळती प्रकरणानंतर अजूनही जिल्हा प्रशासनस्तरावरून नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. अशातच येथील एलपीजी वाहतुकीस परवानगी दिल्याच्या वृत्ताने संतापलेल्या परिसरातील ग्रामस्थांनी जिंदल कंपनीच्या समोर रास्तारोको केल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली.या प्रकारामुळे प्रशासनाने ग्रामस्थांना वार्यावर सोडल्याचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
वायूगळतीतील दुर्घटनाग्रस्त विद्यार्थ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जिंदलच्या पोर्ट विभागात झालेल्या वायूगळतीमुळे जवळपास ८० हून अधिक विद्यार्थ्यांना त्रास झाला होता. यामुळे जयगड पंचक्रोशीतील पालक व विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. योळी पोर्टवरून एलपीजी वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती.www.konkantoday.com