चिपळूण विधानसभा मतदार संघातील रेल्वे स्थानकांच्या प्रलंबित कामांबाबत आ. निकम यांची अधिकार्यांसोबत बैठक
चिपळूण विधानसभा मतदार संघातील रेल्वे स्थानकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या वरिष्ठांसोबत २६ जानेवारीपूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन कोकण रेल्वे रत्नागिरी विभागाचे रिजनल मॅनेजर श्री. बापट यांनी सावर्डे येथे आमदार शेखर निकम यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान दिले.
यावेळी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई, सावर्डे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन कोल्हापूरे, उमेश लकेश्री, सुनितकुमार पाटील इत्यादी उपस्थित होते. चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील रेल्वे स्टेशन संबंधी आमदार निकम यांनी यावेळी माहिती घेवून प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा केली व लवकरच बेलापूर येथे कोकण रेल्वेच्या वरिष्ठांसोबत २६ जानेवारीपूर्वी बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.www.konkantoday.com