चिपळूणच्या पूरनियंत्रण आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक, आमदार शेखर निकम यांनी घेतली अजित पवार यांची भेट
चिपळूण शहर व परिसरातील वाशिष्ठी नदी व उपनदीवरील पूर संरक्षक कामांसाठी २,२०० कोटींचा पूर्व प्राथमिक बृहत आराखडा जलसंपदा विभागाने तयार केला असून त्याच्या मान्यतेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेती. या आराखड्यासंदर्भात लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री पवार यांनी आमदार निकम यांना दिले आहे.
गेल्या ५ वर्षात चिपळूण शहर विकासासाठी आमदार निकम यांच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. पूर नियंत्रणासठी २१ कोटींच्या नलावडा बंधार्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. तर २९० कोटींच्या संरक्षक भिंतीच्या प्रस्तावाबरोबरच पूर नियंत्रणासाठी तयार करण्यात आलेला २,२०० कोटींचा पूर्व प्राथमिक आराखडाही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. यासंदर्भात आमदार निकम यांनी मंगळवारी अर्थमंत्री पवार यांची भेट घेवून चर्चा केली.www.konkantoday.com