उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात रिक्षाचे स्टेअरिंग

रेमंड कंपनी आणि सुपर क्लब आयोजित ‘ऑटोफेस्ट-२०२५’ या ऑटो कार फेस्टिव्हलचे उद्घाटन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पोर्ट्स बाईकपाठोपाठ रिक्षा चालवण्याचा आनंद लुटला.यानिमित्ताने सुरुवातीच्या काळात उदरनिर्वाहसाठी रिक्षा चालविण्याचे काम करणाऱ्या शिंदे यांच्या हातात रिक्षाचे स्टेरिंग दिसून आले.

तसेच रिक्षा चालविण्याचा आंनद लुटत त्यांनी जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.आजही राज्याचे मंत्री म्हणून कार्यरत असले तरी ज्या व्यवसायातून करियरची सुरुवात केली, त्या विषयी त्यांच्या मनात आजही आपुलकी दिसून येते. त्यांनी रिक्षाचालकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. तसेच रिक्षाचालकाचे काम केल्याचे ते सातत्याने अभिमानाने सांगतात. त्यांची रिक्षाविषयीची आपुलकी पुन्हा एकदा दिसून आली आणि यातूनच ऑटोफेस्टमध्ये रिक्षा चालविली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button