आर्थिक निकषांवर अग्रेसर राहिल्यानेच जनमानसात स्वामी स्वरूपानंद पत संस्थेची विश्वासर्ह प्रतिमा – ॲड.दीपक पटवर्धन

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला जनमानसात स्थान निर्माण करता आले याचे कारण आर्थिक निकषांवर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सातत्याने मानांकन राखले. स्वरूपानंद पतसंस्थेचे आर्थिक रिझल्ट नेहमीच उत्तम राहिले. *१० हजार ते ३३८ कोटी ठेवीं ची मजल*सन २०१६ मध्ये पतसंस्थेने ठेवींचा १०० कोटींचा इष्टांक पूर्ण केला. तर २०२० मध्ये संस्थेच्या ठेवी २०० कोटींचा टप्पा पार करत्या झाल्या. तर केवळ तीन वर्षात ३३८ कोटींच्या ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेकडे ठेवीदारांनी संकलित करून ठेवल्या. २५ हजाराच्या घरात असलेली ही ठेव खाती ही संस्थेच्या जनमानसात प्राप्त विस्तृत जनधाराच द्योतक मानलं पाहिजे अस ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले.

ठेवीदारांना विश्वास वाटावा, आश्वस्त वाटाव असे आर्थिक रिझल्ट स्वरूपानंदने सातत्याने दिले. तीस वर्षातल्या वसुलीच्या सरासरीचे प्रमाण ९९% इतकं विक्रमी ठेवणारी स्वरूपानंद पतसंस्था कदाचित महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था असावी. वसुलीतील सातत्य हे स्वरूपानंदच्या यशाच गमक राहिल आहे. गतिमान अर्थकारण करत गेल्या ३२ वर्षात संस्थेने आपला ठसा रत्नागिरीच्या अर्थजगतावर उमटवला आहे. *आर्थिक संस्थेला बलवान करणारा नफा*संस्थेच्या उत्तम वसुली तेवढेच कार्यक्षमतेने अर्थकारण केल्याने स्वरूपानंद सातत्याने ३२ वर्षे निव्वळ नफ्यात राहिली असून गेल्या पाच वर्षात संस्थेने रुपये ३० कोटी ५० लाख निव्वळ नफा प्राप्त केला आहे. संस्थेच्या १७ शाखांमध्ये ठेवी, कर्ज वसुली याचे उत्तम प्रमाण राखत व्यवहार केले आहेत. स्वरूपानंद पतसंस्थेने सलग १० वर्षे १५% लाभांश दिला आहे. रुपये १५ कोटी २१ लाख गंगाजळी गुंतवणूक, रुपये २२ कोटी इमारत निधी गुंतवणूक याचेसह ४८ कोटींचा भर भक्कम स्वनिधी हे संस्थेचे शक्तीस्थान राहिले आहे. स्वरुपानंदने १५२ कोटींची रक्कम विविध बँकांमध्ये स्टॅट्युटरी गुंतवणुकी पोटी गुंतवली असून संस्थेचे भांडवल पर्याप्तेतेचे प्रमाण २८ टक्के इतके उत्तम आहे.

या पार्श्वभूमीवर संस्थेने घोषित केलेल्या नववर्ष स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांचा भरभरून प्रतिसाद प्राप्त होत असून पहिल्या १० दिवसात ४ कोटी ७७ हजारांच्या नव्या ठेवी संकलित केल्या असून उर्वरित २० दिवसात १० कोटींचे उद्दिष्ट पार करून अधिकतचे ठेव संकलन संस्थेकडे होईल असा विश्वास ॲड.दीपक पटवर्धन, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष यांनी व्यक्त केला व ठेवीदारांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या स्वागत ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करून संस्थेच्या विश्वासार्ह व आकर्षक योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button