
रत्नागिरीत उभारले जाणार निसर्गोपचार केंद्र, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यात एखाद्या चांगल्या १० ते १५ एकर जागेवर शासनातर्फे निसर्गोपचार केंद्र साकारले जाणार असून त्यादृष्टीने जागेची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे आग्रही आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात अद्ययावत असे निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून प्रयत्न सुरू झाले असून सध्या होमिओपॅथिक व ऍलोपॅथिक यांचा वापर होत असून भविष्यात याचे महत्व कमी करण्यासाठी निसर्गोपचार केंद्राकडे अनेकांचा ओढा वाढू लागला आहे. हाच धागा पकडून रत्नागिरी तालुक्यात समुद्र किनारी किंवा नदीच्या काठावर अद्ययावत अस निसर्गोपचार केंद्र उभारण्याच्या दृष्टीने जिल्हा निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येणार असून त्यादृष्टीने जिल्हा शल्यचिकित्सक अशोक बोल्डे प्रयत्नशील आहेत. शासनाची जागा जर त्या ठिकाणी नसेल तर एखाद्या व्यक्तीने १० ते १५ एकर जागा विनामूल्य अशा ठिकाणी दिली तर त्या ठिकाणी हे निसर्गोपचार केंद्र साकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असेही बोल्डे यांनी सांगितले.