कोल्हापूर प्रशासनाचा विशाळगडावरील उरुसासंदर्भात मोठा निर्णय.
मागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन विशाळगडावर होणाऱ्या उरुसासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. हिंदुत्ववादी नेते, मंत्री नितेश राणे यांनी विशाळगडावर उरुस होऊ देणार नाही, असा इशारा सांगलीत दिल्यानंतर शेजारीच असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ऊरुसाला परवानगी नाकारली आहे.
विशाळगडावर रविवारी उरूस होणार होता, त्या ऊरुसाला कोणत्याही पद्धतीची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिलेली नाही. विशाळगडावर कोणताही जमाव जमू नये, या पार्श्वभूमीवर सावधनतेचे पाऊल म्हणून प्रशासनाने उरूसाची परवानगी नाकारल्याचे कळते आहे.