सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये सुद्धा सदस्य नोंदणीचे काम मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे -नारायण राणे
रत्नागिरी जिल्हा सुद्धा भाजपाचा जिल्हा आहे हे दाखवण्यासाठी इथल्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागलं पाहिजे. सभासद नोंदणी करून भागणार नाही तर प्रत्येकापर्यंत पोहोचून टार्गेट ठेवून कामाला लागा आणि हा जिल्हा भाजपामय होण्यासाठी सज्ज व्हा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी दक्षिण रत्नागिरीच्या सदस्य नोंदणी आढावा बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.रत्नागिरीत मराठा भवन येथे भाजपाच्या सदस्य नोंदणी संघटन पर्व आढावा बैठकीत खा. राणे बोलत होेते.खा. राणे यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर, रत्नागिरी या पाच तालुक्यातील चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या तालुकाध्यक्ष, युवक अध्यक्ष,महिला मोर्चासह विविध पदाधिकाऱ्यांची बैठक खा. राणे यांनी रत्नागिरीत घेतली.
यावेळी बोलताना खा. राणे यांनी पक्ष आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे याची जाणीव प्रत्येक कार्यकर्त्याला करून दिली. यावेळी बोलताना खा. राणे म्हणाले, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे प्रशासकीय कामासाठी वेगळे असले तरीही माझ्यासाठी आजही हे दोन्ही जिल्हे एकच आहेत असे मी मानतो. दोन्ही ठिकाणची माणसं, दोन्ही ठिकाणचे राहणीमान तेच आहे. त्यामुळे जसं काम सिंधुदुर्गमध्ये होतं तितक्याच गांभीर्याने रत्नागिरीमध्ये सुद्धा सदस्य नोंदणीचे काम झालं पाहिजे.केंद्रात आणि राज्यात आपलीच सत्ता आहे. त्यामुळे विकासाचा निधी हा मागितलाच पाहिजे व तुमचा अधिकार आहे. पण असं असताना आपण आपली जबाबदारी विसरता कामा नये. आज बाजूच्या जिल्ह्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत याचा विचार करून आपल्या कामाला आपण गती दिली पाहिजे