राजापूर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने १७ जानेवारीपासून शिवस्मरण यात्रा गडकोट मोहीम.

राजापूर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने शिवस्मरण यात्रा गडकोट मोहीम १७ ते १९ जानेवारी यादरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये किल्ले पुरंदर, लेण्याद्री गणपती मंदिर, किल्ले शिवनेरी व नाणेघाट यांचा समावेश आहे. हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या या सर्व गडकोट मोहिमा या व्यावसायिक नफा मिळवण्याच्या दृष्टीने न आखता इतिहास शिवप्रेमींना या मोहिमेच्या माध्यमातून ऐतिहासिक गडदुर्गांना भेटी देवून तेथील इतिहास जाणून घेत तो अभ्यासता यावा, अनुभवता यावा या उद्देशाने आखलेल्या असतात असे प्रमुख आयोजक महेश मयेकर यांनी सांगितले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button