रत्नागिरी जिल्ह्याच्या वन आच्छादन क्षेत्रात ६.११ टक्क्याने वाढ.
संपूर्ण राज्यात वन आच्छादन मोठ्या प्रमाणावर घट होत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील वन आच्छादनात ६.११ टक्के वाढ झाल्याचे केंद्रीय पर्यावरण विभागाच्या भारतीय वन सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाले आहे.गेल्याच महिन्यात केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते भारतीय वन सर्वेक्षण अहवाल-२०२३ चे प्रकाशन करण्यात आले. दर दोन वर्षानी देशातील वनांची स्थिती सांगणारा हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात येतो. त्यानुसार जाहीर झालेल्या या अहवालामधून पश्चिम घाटासह राज्यातील वनक्षेत्राबाबत गंभीर बाब समोर आली असताना वाढलेले वन आच्छादन क्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यासाठी आशादायी चित्र आहे.राज्याचे भौगोलिक क्षेत्र ३ लाख ७ हजार ७१३ चौ.की.मी. असून वनक्षेत्र १६.९४ टक्के आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ८२०८ चौ. कि.मी. इतके असून त्यामध्ये जिल्ह्याचे वनक्षेत्र ५१.७६ टक्के आणि त्यातही १२० टक्के हे वनविभागाच्या ताब्यात आहे.www.konkantoday.comm