
रत्नागिरीतील विविध संघटनांसोबत ना. उदय सामंत ह्यांनी साधला संवाद
आज स्वयंवर मंगल कार्यालय, रत्नागिरी येथे सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संघटनांसोबत राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संवाद साधला. यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी बहुमताने निवडून दिल्याबद्दल रत्नागिरीकर जनतेचे मनःपूर्वक आभार मानले.रत्नागिरीकरांनी माझ्यावर विश्वास ठेवत जबाबदारी सोपवली, यामुळे राज्यभर प्रचारासाठी वेळ देता आला, असे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.
यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची अधिसूचना मिळाल्याचे अभिमानाने नमूद केले. या संवादातून रत्नागिरीच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याचा संकल्प पुन्हा दृढ झाला असल्याचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विशेष नमूद केले.