बेपत्ता व्यक्तीबाबत निवेदन.
रत्नागिरी, दि.10 : छबी रामचंद्र पांचाळ या १२ जून २००३ पासून औदुंबर चौक, कोकणनगर ता. जि. रत्नागिरी येथून बेपत्ता आहेत. या बेपत्ता व्यक्तीचे वय-३५ वर्षे, उंची ४ फूट ५ इंच, रंग निमगोरा, बांधा मध्यम अंगात लाल रंगाची साडी, लाल रंगाचा ब्लाऊज, गळ्यात चांदीची चैन व त्या मनोरुग्ण आहेत. या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
तुषार विलास चव्हाण हे निरीक्षण गृह रत्नागिरी पाटबंधारे वसाहत आर/५/११ कुवारबाव ता. जि. रत्नागिरी येथे राहणारा १ जुलै २०१४ पासून देसाई हायस्कूल रत्नागिरी येथून बेपत्ता आहेत. या बेपत्ता व्यक्तीचे वय- १७ वर्षे, उंची १५४ सेमी, रंग गोरा, केस काळे साधारण वाढलेले, बांधा मध्यम, छातीवर उजव्या बाजूला तीळ व अंगात देसाई हायस्कूलचा युनिफॉर्म आहे. या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
मयुर अनंत कदम व स्वप्नील संजय गायकवाड हे १ सप्टेंबर २०१२ पासून निरीक्षण गृह बालसुधार गृह रत्नागिरी येथून बेपत्ता आहेत. मयुर अनंत कदम या बेपत्ता व्यक्तीचे रंग सावळा, केस काळे, बांधा ठेंगू व मजबूत व उजव्या गालावर तीळ आहे. अंगात चौकटीचा शर्ट व नेसणीस हिरव्या रंगाची पँट आहे.
स्वप्नील संजय गायकवाड याची उंची ६ फूट रंग काळा केस काळे उजव्या करंगळीवर तीळ, बांधा मजबूत असा आहे. या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली अथवा त्या कुठेही दिसल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.