
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे एक दिवस काम बंद.
बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणाचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटले. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती गुरूवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांना सरपंच संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले.गेले काही दिवस राज्यात बीड जिल्ह्यातील मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा विषय गाजत आहे. याबाबत विरोधकांनी सत्ताधार्यांना पेचात पकडले आहे. याबाबत चौकशी समितीही नेमली गेली आहे. परंतु गेले महिनाभर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सरपंचांनी एकत्र येत गुरूवारी एकदिवस ग्रामपंचायत बंद ठेवली.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांना याबाबत रत्नागिरी तालुका सरपंच संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष भय्या भोंगले, उपाध्यक्ष अण्णा पाटील, कैलास कांबळे, गगन पाटील, आकांक्षा वीर, प्रिती भाटकर, तन्वी कोकजे, वेदिका बोरकर, गौतम सावंत, जितेंद्र तारवे, संजय सकपाळ उपस्थित होते.www.konkantoday.com