
दादर रत्नागिरी पॅसेंजर चालू करण्याची मनसेची मागणी
कोकण रेल्वे मार्गावरील दादर -रत्नागिरी पॅसेंजर गाडी बंद करण्यात आली आहे. ही गाडी पुन्हा चालू करण्यासाठी रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्ट मंडळाने मनसेचे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांना निवेदन दिले असून, यावर लवकरात लवकर ठोस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या गर्दीने भरून धावत असताना तसेच कोकण रेल्वे मार्गावर आधीच कोकणासाठी गाड्यांची कमतरता असताना कोकणातील ही एक्स्प्रेस बंद करून उत्तर प्रदेशातील गाडी चालवली जाणार असल्याने हा कोकणी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) रत्नागिरीतर्फे कोकण रेल्वेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे