
संगमेश्वर आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावर बिबट्या आडवा आल्याने दुचाकीस्वारासह महिला जखमी.
दुचाकीसमोर अचानक बिबट्या आडवा आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह अन्य एक महिला प्रवासी जखमी झाल्याची घटना संगमेश्वर येथे बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी मुख्य रस्त्यावर घडली. मंदार मोहन रहाटे (२६) आणि प्राजक्ता संतोष चव्हाण (२६, कोळंबे) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल आंबेड-डिंगणी या नेहमीच गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून आंबेडखुर्द येथील मंदार रहाटे व त्यांच्याबरोबर दुचाकीवरून प्रवास करणारी प्राजक्ता चव्हाण हे रेल्वेस्टेनशन येथे जात होते.
यावेळी आंबेडवरून भंडारवाड्याकडे जाणार्या रस्त्याच्या ठिकाणी बिबट्या त्यांच्या दुचाकीला धडक देवून तेथून तो पुन्हा जंगलाच्या दिशेने गेला. मात्र बिबट्याच्या धडकेने दुचाकी रस्त्यावरून काही अंतरावर घासत गेल्याने मंदार रहाटे व प्राजक्ता चव्हाण हे दोघेही जखमी झाले. या दोघांवर संगमेश्वर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले.www.konkantoday.com