शिवसैनिक पराभवाने कधीच खचत नाहीत -जिल्हाप्रमुख संजय कदम.
आजवर शिवसेनेने सत्तेपेक्षा विरोधकांची भूमिका अधिक प्रभावीपणे निभावली आहे. निवडणुकीत एकाचा जय, तर कोणाचा तरी पराभव ठरलेला असतो. शिवसैनिक पराभवाने कधीच खचून जात नाहीत. जनतेच्या न्याय हक्कासाठी ते सतत झटत असतात. विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचा झालेला पराभव हा काही शिवसेनेचा झालेला अंतिम पराभव नाही.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने शिवसेना आता संपली असे कोणाला वाटत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. यापुढील प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या विजयाची घोडदौड झालेली सर्वांना पहायला मिळेल असा आत्मविश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी दापोली येथे झालेल्या शिवसैनिकांच्या निर्धार सभेत बोलताना व्यक्त केला.www.konkantoday.com