शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सायबर क्राईम कार्यशाळा

रत्नागिरी, दि. 9 :-येथील सायबर पोलीस ठाण्याच्यावतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रथम वर्ष एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.*कार्यशाळेमध्ये व्हॉटसअप, फेसबुक, जीमेलआयडी, ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन बँकिंगद्वारे आर्थिक फसवणुकीद्वारे केले जाणारे गुन्हे याबद्द्ल सविस्तर माहिती पोलीस निरीक्षक स्मिता सुतार व सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पाटील यांनी दिली.व्हॉटसअप, फेसबुक यासारख्या समाज माध्यमांचा वापर करताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक माहिती व छायाचित्रे, बोगस खाती बनवून केली जाणारी आर्थिक फसवणूक, अश्लील छायाचित्रे गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक याबाबत दाखल झालेले गुन्हे याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन देखील करण्यात आले. कार्यक्रमाला अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button