रत्नागिरी, सिंधुदुर्गात शहरी गॅस वितरणासाठी नवीन परवाने मिळण्यासाठी शिफारस.
महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी १ हजार कोटींहून अधिक रक्कमेचा आयपीओ सूचीबद्ध करण्याच्या तयारीत असल्याची बातमी आली आहे. या संदर्भात कंपनीने सेबीकडे एक निवेदन सादर केले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यासह पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये शहरी गॅस वितरणासाठी नवीन परवाने मिळवून आपला कामाचा व्याप महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी वाढवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, गेल, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या कंपन्या मिळून महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा उपक्रम उभारत आहेत.
यासाठी १ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा आयपीओ सूचीबद्ध करण्याची तयारी सुरू आहे. याविषयी बीपीसीएल बोर्डाने आयपीओसाठी तत्वतः मान्यता दिली आहे.
नियामक आणि इतर मंजुरीच्या अधीन राहून कार्यवाही करण्यात येईल, असे या कंपनीने सेबीकडे दाखल केलेल्या निवेदनात नमूद केले आहे.बीपीसीएल, गेल या दोन कंपन्यांचा महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडमध्ये प्रत्येकी साडेबावीस टक्के हिस्सा आहे. इंद्रप्रस्थ गॅस मिलिटेड या कंपनीचा ५० टक्के हिस्सा आहे. आणि ५ टक्के एवढा हिस्सा महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने घेण्यामध्ये स्वारस्य दाखवले आहे.www.konkantoday.com