माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे रत्नागिरी दौऱ्यावर.
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर सदस्य नोंदणी संघटन पर्व राबविण्यात येत असून उद्या याचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायण राणे रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे.महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात देखील हे अभियान राबविण्यात येत असून याचा आढावा घेण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार नारायण राणे रत्नागिरी दौऱ्यावर येत असून आज सकाळी मराठा मंदिर हॉल येथे सकाळी ११.३० वाजल्यापासून तीनही विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांकडून संघटन पर्व सदय नोंदणीचा आढावा घेणार आहेत. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.