बुलढाण्याच्या गावकऱ्यांना टक्कल कशामुळे पडलं? लॅब रिपोर्टमध्ये समोर आलं खळबळजनक कारण!

बुलढाणा : बुलढाण्याच्या केस गळती प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बुलढाण्याच्या शेगावमधल्या काही गावांमध्ये लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांचे केस मागच्या काही दिवसांपासून अचानक गळायला सुरूवात झाली. या केस गळतीमध्ये तर अगदी लहान मुलांनाही टक्कल पडलं. यानंतर आरोग्य विभागाने तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. वापरण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे. पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढलेली आहे.

नायट्रेटमुळे जीवघेणे आजा जडू शकतात. नागरिकांना टक्कल पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर पाण्याचे नमुने लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठवण्यात आले होते, या पाणी तपासणीचा अहवाल न्यूज 18 च्या हाती लागला आहे.*बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगावातील पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्याप्रमाणावर आढळून आला आहे. पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे, त्यामुळे गावकऱ्यांसाठी हे पाणी विष ठरत आहे. खारबाण पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेली आहे, मात्र वापण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्यामुळे हे पाणी वापरायोग्य नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.*

बोंडवळ,कालवड,कठोरा,हिंगणा गावातील नागरिक आणि लहान मुलं सध्या चिंतेत आहेत. कारण या गावातल्या लोकांना अचानक टक्कल पडू लागलंय, गेल्या काही दिवसांपासून गावातल्या लोक केसगळतीने हैराण झालेत. अगदी केसांवरुन हात जरी फिरवला तरी केस गळत असल्याने लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. गेल्या पाच ते सहा दिवसातच मोठ्या प्रमाणात केस गळतीमुळं अनेकांना टक्कल पडलंय. या आजाराने गावात शिरकाव केल्यानं गावकरी भयभीत झाले आहेत.केस हे कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा प्रमुख भाग असतात. टक्कल पडल्यामुळे अनेकदा अनेकांना हेटाळणीही सहन करावी लागते. अशातच अकाली केस गळू लागल्याने नागरिक चिंतेत आहेत. आरोग्य विभागाने या आजाराचं कारण शोधून काढत त्यावर प्रतिबंधात्मक उपाय लवकर काढावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button