तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू.

जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यात 6 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तिरुपती मंदिरात गुरुवारी पहाटे वैकुंठ द्वार दर्शन टोकन वाटप सुरू झालं आहे, ज्यासाठी बुधवारी संध्याकाळपासूनच भाविकांनी गर्दी झाली होती.परंतु यादरम्यान चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि यात 6 भाविकांचा मृत्यू झाला. तर 40 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत.इतकी गर्दी नेमकी का जमली?वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच टीटीडी तिरुमला येथे 10 दिवस भाविकांना वैकुंठ द्वार दर्शन घेता येणार आहे. 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत दर्शन घेता येईल.

9 जानेवारीला पहाटे 5 वाजल्यापासून या द्वारावर दर्शन टोकन दिले जाणार होते. या टोकनसाठी भाविकांची गर्दी जमली होती. TTD ने तिरुपती आणि तिरुमला येथे SSD टोकन जारी करण्यासाठी काऊंटर उभारले आहेत.टीटीडीने सांगितल्याप्रमाणे, टोकन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. स्थानिक लोक तसेच इतर भागातील भाविक मोठ्या संख्येने काऊंटरवर पोहोचले. अचानक विष्णू धामच्या काऊंटरवर मारामारी सुरू झाली. त्यामुळे भीतीमुळे लोक इतरत्र पळू लागले आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.

यामध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी आहेत.जखमींना केलं रुग्णालयात दाखलअपघातानंतर 40 जखमींपैकी 28 जणांना रुईया हॉस्पिटलमध्ये आणि 12 जणांना सिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र दुर्दैवाने रुईयामध्ये 4 आणि SIMS मध्ये 2 भाविकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिला आणि 1 पुरुषाचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button