चिपळूण तालुक्यातील तळसरच्या जंगलात वाघासाठी लावलेल्या कॅमेर्यात रानकुत्री, बिबटे कैद.
चिपळूण तालुक्यातील तळसरच्या जंगलात वीस दिवसांपूर्वी पट्टेरी वाघाच्या अस्तित्वाच्या आढळून आलेल्या पाऊलखुणा दोन म्हशींची झालेली शिकार आणि स्थानिकांकडून वाघाच्या अस्तित्वाबाबत सुरू असलेल्या चर्चा या पार्श्वभूमीवर वनविभागाने सात कॅमेरे ट्रॅप जंगलात बसवले मात्र गेल्या काही दिवसात या कॅमेर्यांमध्ये केवळ रानकुत्री आणि बिबटेच कैद होत आहेत. याचबरोबर आता कुंभार्ली घाटातही चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
सह्याद्रीच्या पायथ्यालगतच्या गावात आणखी कॅमेरे ट्रॅप बसवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून २५ कॅमेर्यांची मागणी वरिष्ठ स्तरावर करण्यात आली आहे.तळसरच्या जंगलात २० डिसेंबरच्यादरम्यान पट्टेरी वाघाचा वावर आळून आल्याचे पुढे आले. या गावात दोन म्हैशींही वाघाने मारल्या त्या ठिकाणी पंजाचे ठसेही आढळून आले. शिकार केलेल्या म्हैशीला खाण्याची पद्धत आणि ठशांचा आकार पाहता तो वाघस असण्यावर प्राथपिक स्तरावर शिक्कामोर्तब झाले असले तरी जोपर्यंत त्याचा ठोस आढळ निष्पन्न होत नाही, तोपर्यंत वनविभागाकडून पट्टेरी वाघाच्या अस्तित्वावर कोणतीही जाहीर वाच्यता केलेली नाही.www.konkantoday.com