
शासन दरबारी नमनसारख्या लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे, अभिनेता ओंकार भोजने.
शासन दरबारी नमन सारख्या लोककलेला राजाश्रय मिळाला पाहिजे, त्यासाठी कलावंत, कलाप्रेमी रसिकांनी एकत्र यवून खर्या अर्थाने आवाज उठवणे गरजेचे आहे.
आमच्यासारखे कलावंत देखील आमचे कर्तव्य, जबाबदारी समजून त्यात कायमच सहभागी असतील असे मत अभिनेता ओंकार भोजने यांनी केले.चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे रविवारी नमन लोककला संस्था यांच्यावतीने जागर नमन लोककलेचा सन्मान लोक कलावंतांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, नव्या पिढीसाठीला नमन कला माहिती असणे गरजेचे आहे. त्यांनी देखील ही कला जपली पाहिजे.
नमनाला शेकडो वर्षांचा इतिहास असून ही कोकणात रूजली गेली आहे. आजही या लोक कलेविषयीची संघर्ष करावा लागत असून तो म्हणजे आर्थिक मागासलेपण. सरकारला आपल्या कलेविषयी असलेली उदासिनता या दोन्ही गोष्टींसाठी आपण एकत्र येवून काहीतरी करावे लागले, यात कलावंतांसह कलाप्रेमी रसिक यांनी एकत्र येवून खर्या अर्थाने आवाज उठवणे गरजेचे आहे.www.konkantoday.com