
मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या पाच दिवसात 54 लाख 57 हजार रुपयांची विक्री.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व विक्री प्रदर्शनामध्ये अवघ्या पाच दिवसात 54 लाख 57 हजार रुपयांची विक्री झाली आहे.जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन हे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील स्वरोजगारींनी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध उत्पादित मालाच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मानले जाते.
यामध्ये बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या कलात्मक वस्तू (बुरुड काम, गोधडी, लोकरीच्या विणकाम केलेल्या वस्तू, क्रेयॉनच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी इत्यादी) विविध प्रकारचे घरगुती मसाले (मच्छी मसाले, मटण मसाले) पिठ, पापड (नाचणी, उडीद, लसुण, सोयाबीन, पालक, बीट, टोमॅटो, पोहयाचे, ओव्याचे इत्यादी) लोणची (आंबा, लिंबू, मिरची, आवळा, करवंद विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे. बोन्साय इत्यादी) मध माफक दरात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली.