पाच दिवसांच्या कीर्तन महोत्सवाला रत्नागिरीत प्रारंभ
रत्नागिरी : कीर्तनसंध्या परिवारातर्फे रत्नागिरीत आयोजित केलेल्या पाच दिवसांच्या चौदाव्या कीर्तन महोत्सवाला आज थाटात प्रारंभ झाला. राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्त गोविंदस्वामी आफळे, रत्नागिरीच्या अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, मुख्य य प्रायोजक पितांबरी उद्योग समूहाचे राहुल प्रभुदेसाई, देताय उद्योग समूहाचे जयंतराव देसाई, फिनोलेक्स उद्योग समूहाचे वरिष्ठ अधिकारी सागर चिवटे, वल्लभ कॅटरर्सचे रूपेश देवस्थळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले.
कीर्तनसंध्या परिवाराचे अवधूत जोशी यांनी बुवांचे स्वागत केले. यावर्षी महाभारत या विषयावर चारुदत्तबुवा आफळे निरूपण करणार आहेत. बुवांना तबलासाथ केदार लिंगायत, ऑर्गन साथ चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन साथ उदय गोखले, पखवाज साथ प्रथमेश तारळकर, ॲबल्टन साथ अमेय किल्लेेकर, साइड र्हिदम शार्दूल मोरे करणार आहेत.