
नारळ खरेदी करायला गेला अन् डोक्यातच नारळ पडून व्यक्तीचा जागीच मृत्यू, रायगड जिल्ह्यातील घटना.
रायगडच्या मुरुडमध्ये नारळ खरेदी करायला गेलेल्या व्यक्तीच्या डोक्यात नारळ पडून मृत्यू झालाय.रायगडच्या राजपुरी गावात राहणारे 48 वर्षीय जयेश गीते शिवमंदिरातील अभिषेक पुजेसाठी शहाळं खरेदीसाठी मुरुड समुद्रकिनारी जात होते. बाईकवरुन जात असताना झाडावरील नारळ अचानक त्यांच्या डोक्यात पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत चित्रित झाली आहेत, त्यात जयेश गीते बाईकवरुन जाताना दिसत आहेत. अचानक त्यांच्या डोक्यावर नारळ पडतो आणि ते खाली कोसळतात. रस्त्यावरील नागरिक त्यांच्या मदतीसाठी धावलेही, पण त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतंय.