दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात मिळणार्‍या कटलफिशमुळे मच्छिमार बांधवांना दिलासा

दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात सध्या कटलफिशने चांगला भाव खाल्ला आहे. कटलफिशची आवकही बंपर झाल्याने अनेक कारणांनी मेटाकुटीस आलेल्या मच्छिमार बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे.एलईडी, पर्ससीन, परराज्यातील नौकांमुळे येथील मच्छिमार बांधव आधीच मेटाकुटीस आले आहेत. त्यात डिझेलचे वाढलेले दर, खलाशांचे वाढलेले पगार यामुळे त्यांचे खर्चाचे गणित बिघडून गेले आहे. त्यातच हवामानातील झालेल्या बदलामुळे नियमित मिळणारी मच्छिदेखील मिळणे कठीण झाले आहे. त्यातच सध्या हर्णै बंदरात अटलफिश मोठ्या प्रमाणात येवू लागला आहे. या कटलफिश म्हणून प्रसिद्ध असणार्‍या या माशाला पूर्वी २१० ते२०० रुपये किलो दर मिळत होता.

मात्र आता या माशाला ३०० ते ३३० या असा विक्रमी दर मिळत आहे. कटलफिश या माशाला परदेशात मोठी मागणी असते. यामुळे हा मासा पूर्णपणे निर्यात केला जातो. यामुळे आपल्या देशाला परकीय चलन मोठ्या प्रमाणात प्राप्त होते. सध्या हर्णै बंदरात कटलफिश मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने मच्छिमार बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button