चिपळुणात गोडावूनमधील कपड्यांची दुकानातील कामगाराकडून चोरी.
कामगाराने दुकानाच्या गोडावूनमधील कपडे चोरून नेल्याचा प्रकार चिपळूण शहर बाजारपठेतील तेजल गारमेंटमध्ये ४ जानेवारी रोजी घडला. या प्रकरणी त्या गामगारावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तकीम शब्बीर तांडेल असे गुन्हा झालेल्या कामगाराचे नाव आहे. या बाबतची फिर्याद इंद्रजितसिंह हरनामसिंह गुलाटी (६२, चिपळूण) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जानेवारी सायं. ४ वा. सुमारास शहर बाजारपेठेतील इंद्रजितसिंह गुलाटी यांच्या तेजल गारमेंट या कपड्यांचे गोडावून आले.
त्यामधून ३० हजार २२८ रुपये किंमतीचा कपड्यांचा माल दुकानातील कामगार मुस्तकीन तांडेल हा चोरून नेत असताना गुलाटी यांना आढळून आला. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दांडेल याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com