
ग्रामपंचायत स्तरावर दाखले देताना खबरदारी घ्या : ना. योगेश कदम.
ग्रामपंचायत दाखले देताना संबंधितांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी केले आहे. बांगला देशामधून येऊन कोकणात वास्तव्य करणार्या लोकांकडे ग्रामपंचायतीपासून इतर अनेक यंत्रणांकडून दाखले सापडल्या प्रकरणी चिंता व्यक्त होत असताना ना.कदम यांनी याबाबत संबंधित विभागाला सूचना करणार असल्याचे सांगितले.
पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, खोटे दाखले परप्रांतीय लोकांकडे आढळून येणे ही गंभीर बाब आहे. ज्या देशातून हे लोक भारतात येतात, त्या देशाचा पासपोर्ट फाडून टाकून इथली नवीन डॉक्युमेंट बनवण्याकरिता ते प्रयत्न करीत असतात. त्यावेळी ते बनावट डॉक्युमेंट सादर करतात आणि रेशन कार्ड, आधारकार्ड, ग्रामपंचायत दाखले घेतात