ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे विस्कळीत झालेले कोकण रेल्वेचे वेळापत्रक अखेर पूर्वपदावर.
कोकण मार्गावरील लांजा-आडवलीनजिक ओव्हरहेड वायर तुटून बिघडलले रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक अखेर तिसर्या दिवशी पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सोमवारी ५ गाड्यांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.आडवलीनजिक ओव्हर वायर पुटून विस्कळीत झालेल्या वेळापत्रकाने प्रवाशांना सलग दोन दिवस मनस्ताप सहन करावा लागला होता.
सोमवारी दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे, सीएसएमटी-मंगळूर एक्सप्रेस २ तास ४० मिनिटे, निजामुद्दीन-तिरूवअनंतपुरम राजधानी एक्सप्रेस १ तास ४० मिनिटे, पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस २ तास १५ मिनिटे, तर तिरूवअनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे उशिराने रवाना झाल्या. हा अपवाद वगळता उर्वरित रेल्वेगाड्या नियोजित वेळेत मार्गस्थ झाल्या.www.konkantoday.com