
गोवळ येथे सर्वेक्षणाचे काम बंद पाडणार्यांविरोधात गुन्हा दाखल
राजापूर : गोवळ येथील खासगी जागेत एमआयडीसी अधिकार्यांकडून सर्वेक्षण सुरू असताना सत्यजित चव्हाण, नितीन जठार यांनी अन्य काहींना जमा करून लाठ्या काठ्या घेऊन आपल्या शेतात येऊन सर्वेक्षणाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्वेक्षण करणार्या अधिकारी व कर्मचार्यांना धक्काबुक्की करून काम करण्यापासून रोखून त्यांना गोवळ येथे कोंडून ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच आपणाला शिवीगाळ करून धमकी दिली अशा आशयाची तक्रार गोवळ गावचे शेतकरी गौरव परांजपे यांनी राजापूर पोलिसांत दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी दखल घेत सत्यजित चव्हाण व नितीन जठार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही नोटीसही बजावण्यात आल्याचे परबकर यांनी सांगितले.