
भाडेतत्त्वाची मुदत संपल्याने रत्नागिरी येथील रत्नसागर रिसॉर्ट ला प्रशासनाने लावले सील
रत्नागिरी — भाट्ये येथील रत्नसागर बीच रिसॉर्ट रत्नागिरी यांनी शर्तभंग केल्यामुळे आणि भाडेपट्टा ची मुदत संपल्याने आज तहसीलदार शशिकांत जाधव व त्यांच्या टीमने रत्नागिरी रिसॉर्ट ताब्यात घेतले आहे. याला सील ही लावले आहे.
काल लोकशाही दिनात ही पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी रत्न सागर रिसॉर्ट भाडेतत्त्वावर ची मुदत संपली असून ते शासनाने आपल्या ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली होती. ही भाडेतत्त्वावर ची मुदत ३० सप्टेंबर मध्ये संपली होती.आज तहसीलदार शशिकांत जाधव व त्यांच्या टीमने या रिसॉर्टला सील लावले
www.konkantoday.com