रत्नागिरीतील तरुणाची आठ लाखाची ऑनलाइन फसवणूक

एसएमसी ग्लोबल सेक्युरिटीज लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून त्यातील १० टक्के कमिशन आगावू मागून ८ लाख ३ हजार ९६९ रुपयांची फसवणूक इन्व्हेस्टर महिलेने केली. या प्रकरणी इन्वेस्टर महिलेविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना ४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत फिर्यादी यांच्या राहत्या घरी श्रीनगर खेडशी, रत्नागिरी येथे घडली. ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुधीर भाऊ सकपाळ यांनी ४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत एसएमसी १२८ इन्व्हेस्टर स्ट्राटेजी अपडेट ग्रुप या ग्रुपच्या अडमीन संशयित महिला हिने तिच्या व्हॉटसॲप नंबरवरून फिर्यादी सुधीर सकपाळ यांना कंपन्यांचे अप्पर सर्कीट, ब्लॉक ट्रेड, एआय ट्रेडिंग, आयपीओ यांची माहिती देवून कंपन्यांचे शेअर ट्रेडिंगबाबत सकपाळ यांना गुंतवणूक करण्यास सांगितले. तसेच फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र व एचडीएफसी बॅंक खात्यावरून एनईएफटी तसेच युपीआयवरून रक्कम ट्रान्स्फर करून घेऊन सकपाळ यांना डाऊनलोड करण्यास सांगितले.

एसएमसी ग्लोबल सेक्युरिज लिमिटेड या कंपनीचा लोगो असलेला ॲप्लिकेशनमध्ये सकपाळ यांनी केलेल्या रक्कमेवर त्यांना ५० लाख ४२ हजार ७३८ रुपयांचे प्रॉफिट झाल्याचे भासवून ते प्रॉफिट फिर्यादी सकपाळ यांना परत देण्यासाठी संशयित महिलेने सकपाळ यांनी १० टक्के कमिशन आगावू मागवून सुधीर सकपाळ यांनी गुंतवणूक केलेली एकूण रक्कम ८ लाख ३ हजार ९६९ रुपये तसेच त्यावर फिर्यादी यांना झालेले प्रॉफिट फिर्यादी यांना न देता सुधीर सकपाळ यांची आर्थिक फसवणूक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button