36 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सडक सुरक्षा- जीवन रक्षा बुधवारी उद्घाटन

रत्नागिरी, दि. 6. : 36 वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2025 सडक सुरक्षा- जीवन रक्षा चा उद्घाटन समारंभ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या हस्ते बुधवार दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गणेशनगर, कुवारबाव येथे होणार आहे.

यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, कार्यकारी अभियंता तथा सदस्य सचिव, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अमोल ओटवणेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यावेळी रस्ता सुरक्षा विषयक मोटार ट्रेनिंग स्कूलची प्रबोधन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button