भारताला ‘HMPV’ व्हायरसचा किती धोका?, साथरोग तज्ज्ञ डॉ. रवी गोडसेंची महत्वाची माहिती.

भारतातील बंगळुरु शहरात (HMPV) व्हायरसचे दोन रुग्ण सापडल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे असं गोडसे म्हणाले आहेत.चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोव्हिड पॉलिसी होती. या काळात जी लहान मुले जन्माला आली, ती फारशी घराबाहेर पडली नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही मुले घरातच बसून होती. मुलं जन्माला आल्यानंतर सहा महिने आईचे दूध पितात.

हे दूध बंद झाल्यानंतर पुढील सहा महिने मुलांसाठी महत्त्वाचे असतात. या काळात लहान मुलं आजारांचा सामना कसा करावा, हे शिकतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते.चीनमधील मुलं गेल्या दोन-तीन वर्षांपासून घराबाहेर न पडल्यामुळेच त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे या मुलांना HMPV व्हायरस झाल्यानंतर ती लगेच बरी न होता, त्यांना गंभीर आजार होत आहेत. 2027 पर्यंत HMPV व्हायरस जगातून निघून जाईल.

चीनमध्ये लहान बालकांना HMPV व्हायरसची लागण होत आहे. त्यांच्याकडून पालकांना संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही लहान मुले कुठेही प्रवास करण्याची शक्यता कमी आहे.भारतात कोरोनाच्या काळात चीनइतका कठोर लॉकडाऊन नव्हता. त्यामुळे आपल्याकडील लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती शाबूत राहिली आहे. त्यामुळे हा व्हायरस भारतात फार पसरणार नाही. HMPV व्हायरसवर कोणताही उपाय किंवा लस नाही. पण 2027 पर्यंत आपोआप या व्हायरसचे उच्चाटन होईल, असंही त्यांनी यांनी सांगितलं आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button