
राज्य शासनाच्या वतीने विश्व मराठी संमेलन,मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शोभायात्रा.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने विश्व मराठी संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या निमित्ताने राज्याचे मराठी भाषा व उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व नाट्यगृह ते फर्ग्युसन महाविद्यालय या मार्गावर एक भव्य शोभायात्रा काढण्यात आली.या शोभायात्रेत सुमारे ७ ते ८ हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मराठी भाषेच्या प्रचारासाठी विविध देखावे तयार करण्यात आले होते. ढोल-ताशा, लेझीम, दिंडी, शंखनाद, तसेच मराठी लोककलेचे मनमोहक सादरीकरण करण्यात आले.ही शोभायात्रा मराठी भाषेच्या संस्कृती, परंपरा आणि अभिमानाचे प्रतीक ठरली. मराठी भाषेच्या अभिजाततेचा जागर करणाऱ्या या सोहळ्याने संपूर्ण शहरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण केले.


