
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपली विकासकामे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते मतदारापर्यंत घेऊन गेल्याने यश- आमदार शेखर निकम.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपली विकासकामे महायुतीचे सर्वच कार्यकर्ते मतदारापर्यंत घेऊन गेले.त्यांच्या या मेहनतीमुळेच आव्हानात्मक असलेल्या या निवडणुकीत आपला विजय प्राप्त झाला असल्याचे मत आमदार शेखर निकम यांनी केले.शहरातील राधाताई लाड सभागृहात शनिवारी महायुती नियोजन समिती व हितचिंतक यांचे आभार व सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. त्यापसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत मतधिक्याबाबत बोलत असताना प्रत्येक निवडणुक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणूकीत संकल्प वेगळे असतात.
मी पहिल्यापासून सांगत होतो की, ही निवडणुक आपल्यासाठी आव्हानात्मक आहे. त्याची कारणं अनेक आहेत. कारण निवडणुकीत समोरचा उमेदवार देखील त्याच ताकदीने उतरत असतो. अशाहीस्थितीत तुम्ही सर्व जण ठाम राहून निवडणुकीत आपल्या विकास कामाच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहचलात त्यामुळेच हे यश मिळू शकले.