
एआयमुळे कृषी क्षेत्रात नवीन क्रांती : शरद पवार.
एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, हे एक नवे तंत्र आहे.या तंत्राचा उपयोग करून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडणार आहे, असे उद्गार देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी काढले. चिपळूण येथे सुरू झालेल्या वाशिष्ठी डेअरी कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याचवेळी त्यांच्या हस्ते चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांना ‘पुढारी आयकॉन’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय याविषयी आपले मत मांडले.
शहरातील स्वा. वि. दा. सावरकर मैदानात दि. 5 ते 9 जानेवारीदरम्यान कृषी महोत्सव भरवला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, आ. भास्कर जाधव, हेमंत टकले, माजी आ. रमेश कदम, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, चिपळूण नागरी सह. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका स्मिता चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव, वाशिष्ठी मिल्कचे अध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हाध्यक्ष सुरेश बने आदी मान्यवर उपस्थित होते.