उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या तरुणाने उपमुख्यमंत्री शिंदे यांना इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ करत धमकी दिली.शिंदे यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव हितेश प्रकाश धेंडे (24वर्षे) असून तो ठाणे येथील रहिवासी आहे. याप्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत. तरूणावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी श्रीनगर पोलिस ठाण्यात पोहोचले तेव्हा पोलिस ठाण्याबाहेर पक्षाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय हितेशने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्टही टाकली आहे.याबाबत बोलताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “तरुणांनी एकनाथ शिंदे यांना धमकी का दिली, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. तो विकृत स्वभावाचा असल्याचे बोलले जात आहे.