
उद्यापासून प्राणी संग्रहालये बंद राहण्याची शक्यता; प्राण्यांना एव्हियन फ्ल्यू विषाणूची लागण व्हायरसच्या उत्पातानंतर केंद्राचे निर्देश.
मुंबई :- एकीकडे एचएमपीव्ही व्हायरसने भारतात शिरकाव केल्याने खळबळ उडालेली असताना प्राणी संगहालयांमध्ये देखील एव्हियन फ्ल्यू विषाणूने उत्पात माजविला आहे. नागपूरमध्ये तीन वाघांच्या मृत्यूनंतर केंद्र सरकारने प्राणी संग्रहालये बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
उद्यापासून प्राणी संग्रहालये बंद राहण्याची शक्यता आहे. प्राण्यांना एव्हियन फ्ल्यू विषाणूची लागण होत असल्याने केंद्र शासनाचे निर्देश आले आहेत. नागपुरतील गोरेवाडा येथील तीन वाघांच्या मृत्यूनंतर आता केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राणी संग्रहालय बंद करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे उद्यापासून राज्यातील प्राणी संग्रहालय काही काळासाठी बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपर्यंत याविषयी निर्देश येण्याची शक्यता आहे.
आज सोमवार असल्याने नागपूरचे महाराजबाग बंद आहे. महाराजबाग येथे कोणत्याही प्राण्याला कुठलीही संसर्गाची लक्षणे आढळून आलेली नाहीत, असे डॉ. सुनील बावस्कर, महाराज बाग प्राणी संग्रहालय प्रभारी अधिकारी, नागपूर यांनी सांगितले आहे.