इंद्रधनूचा ‘सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार’ आडिवरे गावातील ऑर्गन निर्माते बाळ दाते यांना जाहीर.
इंद्रधनूचा ‘सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार’ आडिवरे गावातील ऑर्गन निर्माते बाळ दाते यांना जाहीर झाला असून हा पुरस्कार ११ जानेवारी २०२४ रोजी सायं.४.३० वाजता डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,ठाणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्याना हा पुरस्कार प्राप्त होत आहे.स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
इंद्रधनू ही महाराष्ट्रतील अग्रगण्य सांस्कृतिक संस्था असून ती नेहमीच सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्य असलेल्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते.समाजातील विविध क्षेत्रात कार्य करून देशाच्या सामाजिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीला हातभार लावणाऱ्या गुणी व्यक्तींचा सन्मान या रंगोत्सवाच्या माध्यमातून केला जातो.ऑर्गन पुनर्निर्माते उमाशंकर उर्फ बाळ दाते यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक मान्यवर व हितचिंतक यांच्याकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.