
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत “अनबॉक्स सर्विसेस प्रोव्हायडिंग सोल्युशन्स”चे अनावरण विविध कौशल्य असणाऱ्या कुशल कामगारांनी क्यूआर कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन.
रत्नागिरी : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून “अनबॉक्स युवर डिझायर” च्या वतीने “अनबॉक्स सर्विसेस ..प्रोव्हायडिंग सोल्युशन्स”चे अनावरण करण्यात येत असून, या माध्यमातून एसी रिपेरिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फर्निचर, वॉशिंग सर्विस, होम क्लिनिंग, पौरोहित्य, होम क्लिनिंग, सलून, ड्रायव्हर मिळणे, गाडी भाड्याने मिळणे, फॅब्रिकेशन, म्युझिशियन, इव्हेंट मॅनेजमेंट, साउंड सिस्टिम, लाइटिंग अशा विविध सेवा रत्नागिरीकरांना देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती “अनबॉक्स युवर डिझायर”चे गौरांग आगाशे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या सेवा देणाऱ्या संबंधितांकडून प्रतिसाद मिळवण्यासाठी क्यूआर कोड दिला जाणार असून, त्यावरून एक गुगल फॉर्म भरून घेतला जाणार आहे. यानंतर त्या-त्या सेवा देणाऱ्या लोकांचे ग्रुप करून त्यांना सर्व माहिती दिली जाणार आहे. ज्या ज्या कौशल्य असणाऱ्या युवकांना किंवा मोठ्या माणसांना यामध्ये सहभागी व्हायचे, असेल त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात हा क्यूआर कोड स्कॅन करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. आगाशे यांनी यावेळी केले. याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले, “अनबॉक्स युअर डिझायर गेली पाच वर्ष रत्नागिरीमध्ये फूड डिलिव्हरी तसेच किराणामाल व औषधे अशा प्रकारच्या सर्विसेस देत आहे जवळपास ४५ ते ५० तरुणांना यामधून रोजगार प्राप्त होत आहे; परंतु वाढत्या रत्नागिरीचा विचार करता आणि समाजामध्ये वावरत असताना असे दिसून आले की आज अनेक प्रकारच्या सेवा लोकांना रत्नागिरीमध्ये उपलब्ध होत नाही आहे. यावरूनच असे लक्षात आले की आज रत्नागिरीमध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होण्यासाठी काहीतरी एक प्लॅटफॉर्म असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यामुळे तरुण युवकांना रोजगार संधी प्राप्त होऊ शकते किंवा ज्यांचे व्यवसाय आहेत त्यांना ते व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी मदत होऊ शकते.
आज अनेक कौशल्य विकास केंद्रांमधून (स्किल डेव्हलपमेंट सेंटर) तसेच आयटीआय पॉलिटेक्निकमधून तरुण युवक चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन बाहेर पडत असतात. पण त्यांची मोट बांधण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही आणि तो उपलब्ध झाला तर घरबसल्या लोकांना ज्या सेवा हव्या आहेत त्या खात्रीशीर व वेळेमध्ये मिळू शकतात आणि म्हणून गेली दोन वर्ष या प्रोजेक्टवर आम्ही काम चालू केले.””अनबॉक्स सर्विसेस”मध्ये उपलब्ध असलेल्या सेवांविषयी माहिती देताना श्री. आगाशे म्हणाले, “रिक्षा ही अत्यंत आवश्यक सेवाही यात उपलब्ध केली आहे. कोणी प्रवासाला निघाला असेल आणि त्यांच्याकडे अजून लोकांनी यायचं असेल तर ट्रॅव्हल विथ शेअर ही सुद्धा सेवा यामध्ये उपलब्ध आहे. तसेच घरामध्ये अनेक गोष्टी आणलेल्या असतात, जुन्या गोष्टी लोकांना विकायच्या असतात यासाठी रिसेल प्रॉडक्ट ही सेवाही यामध्ये आम्ही घेतलेली आहे. तसेच जॉब अपॉर्च्युनिटीज सुद्धा लोकांना याच्यावर आपण उपलब्ध करून दिलेले आहे.
रत्नागिरीमध्ये कुरियर सेवेलाही आपण सुरुवात करत आहोत. तसेच विविध सेवा की ज्यामध्ये एसी रिपेरिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फर्निचर, वॉशिंग सर्विस, होम क्लिनिंग, पौरोहित्य, होम क्लिनिंग, सलून, ड्रायव्हर मिळणे, गाडी भाड्याने मिळणे, फॅब्रिकेशन, म्युझिशियन, इव्हेंट मॅनेजमेंट, साउंड सिस्टिम, लाइटिंग अशा विविध सेवा आपण आज रत्नागिरीकरांना देण्याचा प्रयत्न यामध्ये करणार आहोत. पूर्वी आपल्याकडे घराघरांमध्ये यलो पेजेस अशी एक डिरेक्टरी असायची, ज्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला संपर्क करता यायचा; परंतु काळाच्या ओघाने सर्व पाठी पडत गेले व आजकाल पटकन एखादा नंबर एखाद्या प्रसंग घडल्यानंतर मिळत नाही. म्हणूनच ही गरज लक्षात घेऊन आपण समाजाचेही काही देणं लागतो या भावनेने “अनबॉक्स साथी” हा टॅब आपण तिथे आणलेला आहे. यामध्ये महत्त्वाचे नंबर आपण लोकांना मोफत देणार आहोत त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व संपर्क क्रमांक लोकांना उपलब्ध राहतील.”अशाप्रकारे आपल्या रत्नागिरीचे आपले असे एक ॲप की ज्यामध्ये जे काही तुम्हाला हवे आहे ते सर्व असणार आणि ते सुद्धा खात्रीशीर, प्रामाणिक व सुरक्षित सेवा देणारे ॲप म्हणून आम्ही ते नावारूपाला आणत आहोत.
आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे तसेच यासाठी असंख्य रत्नागिरीकरांनी व चिपळूणकरांनी गेली पाच वर्ष लोकल फॉर व्होकल या संकल्पनेला धरून अनबॉक्स युअर डिझायर या आपल्या ॲपला उदंड प्रतिसाद दिला आहे, याही ॲपला असाच प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा श्र. आगाशे यांनी व्यक्त केली. हे ॲप रत्नागिरीतील प्रसिद्ध आयटी कंपनी आर्यक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे प्रशांत आचार्य व ऋषिकेश सरपोतदार यांनी केली आहे. तेही आमच्याबरोबर या पूर्ण ५ वर्षांच्या प्रवासामध्ये डेव्हलपर म्हणून काम करत आहेत. त्यांच्याच अनेक प्रयत्नांमुळे हे ॲप या दर्जाला आणणे शक्य झालेले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : गौरांग आगाशे, अनबॉक्स युअर डिझायर (9730310799)क्यूआर कोड :