विविध प्रश्नाबाबत कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती पदाधिकार्यांनी खासदार नारायण राणे यांची भेट घेतली
कोकण रेल्वेच्या सोयी सुविधा, राज्य अंतर्गत प्रश्न राज्य शासनाच्या माध्यमातून सोडविले जातील. तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातील आंबा पिकासाठी रो -रो सेवा व अन्य सुविधा प्रश्नाला न्याय देण्यासाठी लक्ष केंद्रीत करू.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण करण्यासाठी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहाही स्टेशनच्या विकासासाठी रेल्वे अधिकार्यांसमवेत अहवाल तयार करून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही खा. नारायण राणे यांनी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती सदस्यांना दिली. खा. राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समिती पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली.