माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचे निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
शिवसेना नेते व माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना गजानन कीर्तिकर यांचे आज अल्पश: आजाराने निधन झाले. त्या ८२ वर्षांच्या होत्या.आज रविवारी ५ जानेवारी २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर गोरेगाव पूर्व मधील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी मेघना कीर्तिकर या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर वांद्र्यातील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज रविवारी 5 जानेवारी 2025 रोजी पहाटे ३.३० वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.