ताम्हाणे गावातील एका कडून ६ जीवंत काडतुसांसह बंदूक जप्त.
सहा जिवंत काडतुसांसह सिंगल बॅरेल बंदूक बाळगणाऱ्या संगमेश्वर येथील ताम्हाणे गावातील प्रौढाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांचे पथकाने अटक केली.गोपनीय बातमीच्या आधारे हि कारवाई केली. संगमेश्वर ते देवरूख जाणारे रोडवरील ताम्हाणे गावी संदीप शांताराम रेवाळे, वय ४८ वर्षे, रा. ताम्हाणे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी याचयाकडे काही शस्त्र असलायची माहिती मिळाली होती.
पथकाने छापा टाकला तेव्हा संदीप रेवाळे याच्या ताब्यातुन १ सिंगल बॅरल काडतूसची बंदुक व ६ जिवंत काडतुसे तसेच ३ वापरलेली काडतूसे असा एकुण ३६,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.